सातारा मध्ये सबका साथ सबका विकास म्हणत केला उदयनराजे यांचा प्रचार
Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी उदयनराजेंना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शौचालयात पैसे खाणाऱ्या उमेदवाराला उदयनराजेंच्या विरोधात सातारा लोकसभेची उमेदवारी दिली आहे, या नेत्याची तुतारीची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
मोदी आता युवकांसाठी २० लाख लोनची गॅरंटी घेणार असल्याचे ते यावेळी बोले आहे. जवळपास १ कोटी महिला या लखपती दीदी झाल्या आहे. जेव्हा सत्ता होती, तेव्हा जनतेला वाऱ्यावर सोडलेल्या नेत्याने मोदींना ऊसातलं काय कळतं अशी टिंगल केली होती. त्याच मोदींनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर असलेला इन्कम टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. मोदींना समजलं ते तुम्हाला समजलं नाही. जनतेच्या मनातील स्पंदन, रुदन हे मोदींना थेट समजते,असे ते म्हणाले.
मागच्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी कायदे बदलले साखर कारखाने कारखान्यांना ताकद दिली. भारताला आधुनिक बनवण्याचे काम केले. अशावेळी मोदींचे दोन विरोधक ध्रुव आहेत. एक राहुल गांधी आणि शरद पवार त्यांची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. शरद पवार पंतप्रधान होऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरेंनी प्रश्न सुटत नाहीत. महायुतीची गाडी ही सर्वसामान्यांची सभा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारी गाडी आहे. त्या विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन आहे, डबे नाहीत. राहुल गांधींच्या इंजिनात फक्त सोनिया आणि प्रियांकांचा जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनात सुप्रिया सुळे शिवाय कोणी नाही. आणि उद्धव ठाकरेंच्या डब्यात इंजिनात आदित्य शिवाय कोणाला जागा नाही. ते तुम्हाला कुठेही जागा देऊ शकत नाहीत आणि तुमचा विकास करू शकत नाहीत.
शरद पवार हे दुटप्पीपणा करतात कोल्हापुरात शाहू महाराजांना बिनविरोध करण्याची भाषा करतात आणि साताऱ्यात विरोध करतात. आणि परत उमेदवार उभा केला तरी असा केला की त्यांनी शौचालयातही पैसे खाल्ले , आताउदयनराजे भोसले हे तुतारीच्या पिपाणी झाल्या शिवाय राहणार नाही, आपण सर्वानी मिळून महाराजांना दिल्ली ला पाठवा असे फडणवीस यावेळी म्हणाले.
महायुतीचे सातारातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी डॉ. गिरीश महाजन, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार देवयानी फरांदे, महादेव जानकर, राष्ट्रवादीचे अमित कदम, आरपीआयचे अशोक गायकवाड, माजी आमदार मदन भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुनील काटकर आदी उपस्थित होते.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत