जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
मालवण(Malvan):जयदीप आपटे (Jaydeep Apte) सरकारचा नातेवाईक आहे, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) केली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेतलंय. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
जयंत पाटील म्हणाले, जयदीप आपटे हा सरकारचा नातेवाईक आहे. कंत्राटही त्याला दिलं आता जामीनही त्याला देण्यासाठी प्रयत्न करतील. त्याच्याकडे पात्रता नसतानाही त्याला काम देण्यात आलं आहे. सरकारला हे भोगाव लागेल तसेच याची किंमत मोजावी लागेल.
उद्धव ठाकरे महाविकासआघाडीच्या कार्यक्रमाला गैरहजर, जयंत पाटील म्हणाले…
सांगलीतील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मला काही फार माहीत नाही. काही कारणास्तव ते आले नसतील. राजकीय कार्यक्रम नसून व्यक्तिगत कार्यक्रम आहे.
जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटने संदर्भात असलेला मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. चेतन पाटील यांची पोलीस कोठडी आज संपत असून पोलिस तपास करायचा असल्यास त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तर मुख्य आरोपी जयदीप आपटे याची तपासाअंती चार्जशीट दाखल केली जाणार त्यात जयदीप आपटे याची चौकशीत काय काय अपेक्षित आहे त्यानुसार पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी मालवण न्यायालय परिसरात दाखल झाले आहे. मुंबईवरून विमानाने ते गोव्यात आले. तिथून कारने मालवणमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या सोबत स्थानिक वकील अॅड राजू परुळेकर ही असणार आहे.
राज्य दिवाळखोरीकडे चालले : जयंत पाटील
आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे. जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. तिजोरीत पैसे शिल्लक नाही. सरकारच्या खात्यात पैसे नसले तरी आपण मानवतावादीदृष्ट्या आम्ही मदत करायचे. मात्र या सरकारने आता हे सर्व बंद केले आहे. हे सरकार रस्ते बांधून पैसे काढत आहेत. मागणी नसताना ही रस्ते बांधले जात आहेत, असाच शक्तीपीठ महामार्ग आहे.
पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये कोणालाच बिल मिळणार नाही : जयंत पाटील
विद्यार्थी शिष्यवृत्तीवर जयंत पाटील म्हणाले, सर्वच विभागांना याचा फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांच्या ही शिष्यवृत्त्या थांबवलेल्या आहे. कंत्राटदारांचे पैसेही थकलेले आहेत. जर कंत्राटदारांना आत्महत्या करायची नसेल तर त्यांनी काम थांबवलं पाहिजे. पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये कोणालाच बिल मिळणार नाही.
जयदीप आपटेच्या मागावर होती सात पथकं
जयदीप आपटेला शोधण्यासाठी मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची सात पथकं कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे स्वत:च कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला. तो जेव्हा तावडीत सापडला तेव्हा तो गयावया करु लागला. रडू लागला अशी माहिती आता समोर येते आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून फरार होता जयदीप आपटे
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. दुपारी १ वाजून १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी तर हळहळलेच. मात्र पुतळा पडल्याचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त अतिशय नाराज झाले. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली. तर विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटे कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो फरार झाला होता. तेव्हापासून जयदीप आपटेला अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
जयदीप आपटेला आम्ही अटक केली आहे. कल्याणमध्ये तो आला तेव्हा त्याला अटक केली. आता न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार आहे. तपास यंत्रणांना जयदीप आपटे सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. आम्ही गुप्तपणे कारवाई केली. जयदीप आपटे प्रकरणाचं राजकारण करण्यात आलं, अनेकांनी राजकीय पोळ्या भाजण्याचं काम केलं त्यामुळे आम्ही गुप्तपणे ही कारवाई केली अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी माध्यमांना दिली.
More Stories
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन
केरळ(Kerala):अदाणी समूहाच्या विळिण्यम बंदराने रचला इतिहास, 2000 हून अधिक कंटेनर घेऊन पहिली मदर शिप दाखल.
दहशतवादी हल्ले(Terrorist Attacks): दहशतवाद्यांचा नवीन पॅटर्न; जम्मूमध्ये का वाढत आहेत हल्ले?