राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.
जालना : मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांची तब्येत खालावत असल्याने जिल्हा आरोग्य वैद्यकीय पथकाने उपचारासाठी मनोज जरांगे यांना विनंती केली, मात्र मनोज जरांगे यानी उपचारास नकार दिल्याने डॉक्टरांच पथक माघारी फिरले, डॉक्टरांनी मनोज जरांगे यांचा बीपी आणि शुगर डाऊन झाल्याने त्यांना उपचाराची गरज असल्याचं सांगितलंय. आतापर्यंत सरकारमधील कोणत्याही नेत्याने जरांगेंची अद्याप भेट घेतलेली नाही. आतपर्यंत मनोज जरांगेंना कोण कोण भेटून गेले याविषयी जाणून घेऊया.
राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आंदोलनाला सुरुवात केलीय. कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. परंतु, मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यापूर्वी 3 खासदार आणि दोन आमदार भेटून गेले आहे. तर उपोषणा दरम्यान दोन आमदार आणि एक खासदार भेटून गेले आहेत
उपोषणाअगोदर भेटायला आलेले नेते
- विद्यमान खासदार – बजरंग सोनवणे, बीड (महाविकास आघाडी)
- विद्यमान खासदार – संजय जाधव, परभणी (महाविकास आघाडी)
- विद्यमान आमदार- बाळासाहेब पाटील अहमदपूर विधानसभा, लातूर (अजित पवार राष्ट्रवादी)
उपोषण काळात भेटायला आलेले नेते
उपोषणादरम्यान मनोज जारांगे यांच्या भेटीला 8 तारखेपासून आलेले नेते
- 8 जून – उपोषणाच्या दिवशी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची पहिल्यांदा भेट घेतली.
- 9 जून- संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी भेट घेतली
- 10 जून – जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सकाळी मनोज जारांगे यांची भेट घेतली.
- दुपारच्या वेळी माजी मंत्री तथा शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी रीघ
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर महत्वपूर्ण ठरलाय. निवडणुकीत यश मिळवल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी मला मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला असं म्हटलं. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी विजय मिळवल्यानंतर थेट मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचे श्रेयही जरांगे पाटील यांना दिले. नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर शिवाय अनेक लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव पाहायला मिळाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. काही उमेदवारांनी स्वत: मनोज जरांगेंचा फायदा झाल्याचे स्पष्ट केले आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत