MCN News Impact : कैलाश नगर रस्त्यावर विद्युत पोल व दुभाजक बस्विण्याचा कामाला सुरुवात…

स्थानिक नागरिकांनी एम सी एन न्यूज सह मनपा प्रशासनचे मानले आभार…

 

MCN News Impact : लक्ष्मण चावडी ते कैलाश नगर रुधिकरन नंतर सिमेंट रस्ता होऊन ही या मार्गात मधोमध असलेल्या विद्युत पोल न काढल्या मुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक अपघात होत असल्याची बातम्या एम सी एन न्यूज नी प्रसारित केली होती,या वर प्रशासन कडून दाखल घेत येथील नवीन विद्युत पोल आणि दुभाजक टाकण्याचे काम सुरू केले आहे.

 

शहरातील जालना रोडला जीवन वहिनी म्हणून संबोधले जात आहे ,कारण या मार्ग वर बाहेर गावातून जाणारे आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने वाहतूक करत असतात , यात जर कोंडी निर्माण झाली तर पूर्ण वाहतूक व्यवस्था खोळबली जाते.

 

फेबुवारी महिन्यात गॅस गळती दुर्घटना घडली शहर वर आलेले मोठे संकट ठळले होते, या वेळी जालना रस्त्या वरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती यामुळे शहर भरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.त्या वेळी प्रशासन खडबडून जाग आली आणि पर्यायी मार्गावर मंथन होऊन कार्तिकी चौक ते कैलश नगर ,एम जी एम या डी पी मार्गाचा रखडलेले काम पूर्ण करण्याचे हालचाली सुरू झाल्या,यात बाधित मालमत्ता भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी विशेष अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आणि त्वरित लक्ष्मण चावडी ते कैलाश नगर सिमेंट काँक्रिट करण करण्यात आले, परंतु रस्त्यावरील विद्युत पोल तसेच राहिलेल्या मुळे रस्ता होऊन सुद्धा वाहतूक समस्या तशीच राहिली.वीज कंपनी व मनपा मधील समन्वय नसल्याने है काम रखडलं .

 

या रस्त्यावर लाईट विद्युत पोल आणि रस्त्याचा कडेला असलेल्या उभ्या मोठ्या जड वाहन मुळे अनेक अपघात होऊन वाहतूक कोंडी चां समस्या मुळे स्थानिक नागरिक व वाहन चालक प रेशान झाले होते .यात कैलाश नगर स्मशान भूमी आंतविधी साठी आलेल्या स्वर्ग रथाला या संमस्यचा सामना करावा लागत असल्याने प्रशासन विरोधात मोठी संतापाची लाट उसळली होती.

 

या विषयी एम सी एन न्यूज ने सतत बातम्या प्रसारित करून नागरिकाचा भावना प्रशासन पर्यात पोहचण्याचा प्रयत्न केला आणि याची दखल घेत मनपा प्रशासन या रस्त्यावर नवीन लाईट खांब टकण्याचे काम सुरू केले असून लवकरच जुने पोल हटविण्यात येणार आहे तसेच दुभाजकाचे सुद्धा काम सुरू केल्याने स्थानिक नागरिकांनी एम सी एन न्यूज सह मनपा प्रशासनचे आभार युक्त केले.