मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर 17 मे रोजी मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यसपीठावर असणार आहे. त्यावेळी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: महायुतीकडून (Mahayuti) राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबई लोकसभा निवडणुकीच्या (Mumbai Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर भेट असल्याची माहिती समोर आली आहे.
मनसेने महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेत आहे. ठाण्यात आणि कोकणात राज ठाकरेंच्या सभा झाल्या आहेत. आता 17 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सांगता सभा मुंबईत शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. या सभेचे निमंत्रण देखील देणार आहेत. मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी सध्या महायुतीच्या उमेदवारासाठी काम करत आहेत. 17 मे रोजी मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यसपीठावर असणार आहे. त्यावेळी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी मतापर्यंत कसे पोहचायचे?
शिवाजी पार्कवर होणाऱ्या या सभेची मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. मुंबईतील सहा जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत मनसेची ताकद तेवढीच महत्त्वाची आहे. मराठी मताचा टक्का हा मनसेकडे देखील आहे. त्यामुळे मराठी मतांची जबाबदारी मनसेच्या खांद्यावर देण्यात आली आहे.मुंबईतील प्रत्येक जागा निवडून आणायची असेल तर मराठी मते ही तेवढीच महत्त्वाची आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मुंबईत प्रचार कशा प्रकारे करायचे आहे. मराठी मतापर्यंत कसे पोहचायचे याची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे सध्या महायुतीच्या उमेदवारंचा प्रचार करत आहे. राज ठाकरे देखील सभा घेताना दिसत आहे. मुंबईतील महायुतीचे उमेदवार, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. आता बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. राज ठाकरेंवर या भेटीत कोणती जबाबदारी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत