अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांनी ट्विट करुन सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या खास भेटीबाबत सर्वांना सांगितले. सुनेत्रा वहिनींना अजितदादांना गुलाबाचं फुल दिलं. अजित पवार आज नगरच्या दौऱ्यावर
मुंबई(Mumbai): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 65 वा वाढदिवस आहे. अजितदादा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी राहून हारतुरे न स्वीकारत न बसता अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अजित पवारयांच्यावर आज सकाळपासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचे फुल दिले. हेच फूल जॅकेटवर लावून अजित पवार नगरच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
अजित पवार यांनी ट्विट करुन सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या खास भेटीबाबत सर्वांना सांगितले. मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीने गुलाबाचे फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. एरवी अजित पवार हे त्यांचे वैयक्तिक आयुष्याविषयी फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. मात्र, आज पहिल्यांदाच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील केमेस्ट्री जाहीरपणे दिसून आली आहे.
अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या कंपनीने अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक रणनीती निश्चित केली होती. त्यानुसार महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर वाढवावा, असा सल्ला कंपनीने दिला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंग आता ठसठशीतपणे दिसू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवार गुलाबी रंगाची जॅकेटस परिधान करत आहेत. यानंतर आता अजितदादांनी पहिल्यांदाच सुनेत्रा पवार आणि त्यांच्यातील केमेस्ट्री जगासमोर आणली आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे एरवी फक्त रोखठोक वक्तव्य आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू पाहायला मिळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी अजितदादांना फोनवरुन दिल्या शुभेच्छा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच अजित पवार यांना दूरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनीही अमित शहा यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत