आंदोलन कसे करावे हे लक्ष्मण हाकेंकडून शिका, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे. पंकजा मुंडेंनी ट्वीट करताना कोणाचेही नाव न घेतल्याने पंकजा मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे आहे? या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई(Mumbai) : राज्यात आरक्षणाचामुद्दा चांगलाच तापला असून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी देत आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, दुसरीकडे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं आहे. त्यामध्ये, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. सरकारच्या धोरणावर आपण नाराज असल्याचे पंकजा मुंडेंनी कबुली दिली आहे. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. आंदोलन कसे करावे हे लक्ष्मण हाकेंकडून शिका, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे. पंकजा मुंडेंनी ट्वीट करताना कोणाचेही नाव न घेतल्याने पंकजा मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे आहे? या चर्चांना उधाण आले आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे गेल्या सात दिवसापासून उपोषण करत आहेत. पंकजा मुंडे यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी, उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच पंकजा मुंडेंकडून रोज हाकेंची विचारपूस देखील करत आहे. राज्याचे प्रमुखांनी आंदोलनस्थळी येऊन भेट न दिल्याने देखील पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली होती.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ट्वीटमध्ये?
पंकजा मुंडे म्हणाल्या, आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटनेबद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोद्रीमध्ये पहा…वाह रे वाह..
पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू
पंकजा मुंडे या ओबीसी चेहरा आहेत. त्यात आता राज्यात एकीकडे मराठा आरक्षणामुळे वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही मैदानात शड्डू ठोकला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडेंना बसला होता. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात मराठा बरोबरच ओबीसी समाजाची नाराजी भाजपला ओढवून घेणे महागात पडणार आहे. याचा विचार करता पंकजा यांच्यासाठी भाजप श्रेष्ठी थोडा वेगळा विचार करत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
More Stories
काठमांडू(Nepal Bus Accident):नेपाळमध्ये बस दुर्घटनेत मृत पावलेल्या जळगावच्या भाविकांची संख्या 27 वर, अनेक भाविक बेपत्ता!
मुंबई(Mumbai):व्याजदर अन् रेपोरेट जैसे थे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची मोठी घोषणा!
मुंबई(Mumbai):विधानसभेआधी ठाकरे- शिंदे वर्षावर भेटले, चर्चा काय झाली?