Mumbai Metro Closed Time : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये पावणे सात वाजता रोड शो होणार असून त्याचा परिणाम मुंबई मेट्रोच्या सेवेवर होणार आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो होत असून त्याचा परिणाम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. मोदींच्या रोड शोमुळे मुंबई मेट्रोने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई मेट्रोची घाटकोपर ते जागृतीनगर (Mumbai Metro Closed Today) ही सेवा आज सांयकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही मेट्रो सेवा बंद राहणार असल्याचं मुंबई मेट्रोने स्पष्ट केलं आहे. मुंबई मेट्रोने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वाहतुकीच्या मार्गात बदल
सायंकाळी 6.30 वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा 6.45 मिनिटांनी सुरू होऊन तो 7.45 ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल. या गोष्टी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात खालीलप्रमाणे बदल केला आहे,
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो चा मार्ग
अशोक सिल्क मिल येथून रोड शो सुरु होईल.
पुढे रोड शो सर्वोदय जंक्शन ओलांडून मार्गक्रमण करेल.
एमजी रोड येथे डावे वळण घेऊन रोड शो घाटकोपर पश्चिमेकडून पूर्वेला जाईल.
घाटकोपर पूर्वेकडे वल्लभ बाग जंक्शन येथे पोहचेल.
याठिकाणी असलेल्या पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ रोड शो चा समारोप होईल.
विक्रोळी कांजूरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुन्नाभटी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे, वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी असणार आहे.
मुंबईत येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत