mcnnews.tv

मुंबई(Mumbai): महायुतीत राष्ट्रवादी नाराज? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला नेत्यांची दांडी.

Mumbai, Sep 01 (ANI): Maharashtra Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar during 'Mahayuti' meeting, in Mumbai on Friday. (ANI Photo)

आगामी अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकही नेता फिरकला नाही. त्यामुळे महायुतीत नक्की काय सुरू आहे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.

मुंबई(Mumbai): लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत सर्व काही आलबेल आहे अशी स्थिती नाही. निवडणुकीतून सपाटून मार खाल्ल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवण्यात येत आहे. त्यात राष्ट्रवादीने भाजपचे काम केले नाही असाही सुर लावला जात आहे. त्यात भर म्हणून की काय केंद्रीय मंत्रिमंडळातही राष्ट्रवादीला स्थान देण्यात आले नाही. पुढे सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा अर्ज दाखल करतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिसले नाहीत. आता आगामी अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकही नेता फिरकला नाही. त्यामुळे महायुतीत नक्की काय सुरू आहे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होवू घातले आहे. त्यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही. अजित पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील पुण्यात होते. राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने इतक्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने वेगवेगळ्या चर्चा मात्र राजकीय वर्तूळात केल्या जात आहेत. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे का? अशीही चर्चा सुरू आहे. या बैठकीला विरोधपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तशीच हजेरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही लावता आली असती. मात्र तसे झाले नाही.

महायुतीत अजित पवार एकाकी? 

लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असाही आरोप केला जात आहे. यावर चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्रिमंडळातही अजित पवार गटाला स्थान मिळाले नाही. कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी असताना राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. ती ऑफर राष्ट्रवादीने फेटाळली. वेट अँण्ड वॉचच्या भूमीकेत राष्ट्रवादी गेली. त्यानंतर राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित राहीले. आता कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अजित पवारांनी दांडी मारली. त्यामुळे हे चित्र पाहिल्यानंतर महायुतीत नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत नाराज आहे का? अजित पवार सध्या महायुतीत एकटे पडले आहेत का? हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

अजित पवारांची बैठकीकडे पाठ का? 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला गैरहजर होते. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. बैठकीला ते येणार नव्हते याची कल्पना आपल्याला होती. बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी त्यांनी मागितली होती असे नार्वेकर म्हणाले. त्यानुसार त्यांना गैरहजर राहण्याची परवानगी दिली होती असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान पावसाळी अधिवेश हे दोन आठवड्यांचे होणार आहे. यामध्ये महत्वाच्या विषयांना प्राधान्य दिले जाईल असेही नार्वेकर यांनी सांगितले. तर अधिवेशनात सर्वांना आपले मत मांडायला मिळायला पाहीजे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. शिवाय अधिवेशनाचा वेळ वाढवण्याची मागणीही त्यांनी केली. काँग्रेसनेही अधिवेशनाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

विरोधक आक्रमक होणार 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आता आक्रमक झाले आहेत. आगामी अधिवेशनात ते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील हे निश्चित आहे. त्याची झलक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दिसून आली. विधानसभा निवडणुकी आधी हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे या शेवटच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याची ही विरोधकांकडे संधी आहे. तर विरोधकांनाही जशाच तसे उत्तर देण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचे आहे.

Exit mobile version