लोकसभा निवडणुकीत शिरलेल्या बांबूचं काय करायचं, हे विचारायला एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हेच महायुती सरकारचं धोरण, संजय राऊतांची घणाघाती टीका.
नाशिक(Nashik): सकाळी उठून भोंगे वाजवणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बांबू लावायला पाहिजे, असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचेखासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युतर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीला बांबू लावला. विधानसभा निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल. हा बांबू इतका आतमध्ये गेला आहे की, आता त्यांना स्वप्नातही बांबूच दिसतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी अवैध सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना बांबू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून बांबू घातलेलं आहे तो काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आतमध्ये घुसलेला बांबू खेचून काढायचा की ऑपरेशन करुन काढायचा, याचा अभ्यास सध्या देवेंद्र फडणवीस करत आहेत. या अभ्यासावर त्यांना कदाचित एखादी बोगस डिग्रीही मिळू शकते. कदाचित मोदी-शाहाच त्यांना बांबू घालतात, हे बघावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे द्या. तेलंगणात सरकारने पु्न्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. महायुतीच्या नेत्यांना टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा दूध उत्पादक आणि कांदा उत्पादक यांना निधी दिला पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर तो आम्ही विधानसभेत घालू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी बांबू संवर्धनाविषयीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बांबू संवर्धनाचे महत्त्व पटवून देताना त्यांची गाडी राजकारणाकडे वळली होती. त्यांनी म्हटले होते की, बांबू एक महत्त्वाचा वृक्ष आहे. बांबूचे अनेक बाय प्रोडक्ट आहेत. त्यामुळे बांबूची लागवड मोठ्याप्रमाणावर केली पाहिजे. याशिवाय, काही लोकांना बांबू लावला पाहिजे. काही असे लोक आहेत जे सकाळी-सकाळी भोंगा वाजवतात. एक भोंगा निघालाय तर दुसरा सुरु आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत