नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला अपघात झालाय. बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण अद्याप बेपत्ता आहेत.
महाराष्ट्रावर शोककळा! ४० पर्यटकांची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, १४ जणांना जलसमाधी
काठमांडू(Nepal Bus Accident): महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील १४ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. यामध्ये ३१ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे.भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील 80 जण नेपाळ येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी खैरनी नदीमध्ये एक बस कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र आपल्या परिवारातील लोक सुखरुप आहेत की नाही याची माहिती अजून या परिवाराला मिळाली नाहीये. नेपाळ बस दुर्घटनाप्रकरणी (Nepal Bus Accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत संवाद साधला आहे. वायूसेनेच्या विमानाने आज 27 जणांचे मृतदेह महाराष्ट्रात आणणार आहे.
नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला अपघात झालाय. बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 40 जण होते. नेपाळमधल्या पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात(Nepal Bus Accident) झाला आहे. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसरातले आहेत. हे प्रवासी 16 ऑगस्टपासून देवदर्शनाला गेले होते..
पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात असताना महाराष्ट्रातील पर्यटकांची एक बस तनहून जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली. महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक तीर्थयात्रेसाठी नेपाळला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. ३१ जण जखमी आहेत. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत (Nepal Bus Accident)पडली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
हेल्पलाइन नंबर जारी
नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी काठमांडू स्थित भारतीय दूतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा नंबर जारी करण्यात आला आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी +9779851107021 जारी केलेला हेल्पलाइन नंबर आहे.
10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून 104 लोकांचा एक गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता आणि त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारच्या दिवशी, काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त (Nepal Bus Accident)झाली. सशस्त्र पोलिस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.
आज मृतदेह महाराष्ट्रात येणार
केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायूसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.
मंत्री अनिल पाटील यांची माहिती
दरम्यान, पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अपघातावेळी ११० पर्यटकांच्या तीन बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होत्या. त्यापैकी ४१ जण प्रवास करत असलेली बस नदीत कोसळली.नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते. नदीजवळच्या खडकावर मृतदेहांचा खच पडला होता. रक्तानं दगड माखले होते. जखमींचा आक्रोश होता. मन सुन्न करणारे अपघाताचे फोटो समोर आले आहेत. हा(Nepal Bus Accident) अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
या अपघाताबाबत महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नेपाळ सहलीला गेलेले सर्व लोक महाराष्ट्रातील भुसावळमधील धरणगाव भागातील रहिवासी होते. ते नेपाळला पर्यटनासाठी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सर्वजण गोरखपूरहून बसने निघाले होते.पोखराहून काठमांडूसाठी 3 बसेस निघाल्याचे त्यांनी सांगितले. विमानात 104 लोक होते. या तीन बसपैकी एक बस मर्स्यांगडी नदीत(Nepal Bus Accident) पडली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्र सरकार संबंधित अधिकारी आणि नेपाळच्या दूतावासाच्या संपर्कात आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे नेपाळला रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली.
More Stories
मुंबई(Mumbai):व्याजदर अन् रेपोरेट जैसे थे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची मोठी घोषणा!
मुंबई(Mumbai):विधानसभेआधी ठाकरे- शिंदे वर्षावर भेटले, चर्चा काय झाली?
परभणी(Parbhani):शरद पवार, उद्धव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा, चिल्लर लोकांच्या काय फोडता? : प्रकाश आंबेडकर