नवी दिल्ली(new delhi) : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी होत आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन केलं. नितीश कुमार म्हणाले, आमचं मोदींना पूर्ण समर्थन आहे, लवकरात लवकर तुम्ही शपथ घ्या, आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत. यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला, पण पुढच्यावेळी विरोधी सर्व हरतील, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटकपक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मंचावर विशेष स्थान देण्यात आलं. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह NDA च्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळालं.
मोदींच्या एन्ट्रीला घोषणाबाजी
दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमध्ये एन्ट्री झाली. त्यांचं स्वागत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं. मोदींच्या एन्ट्रीवेळी सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘स्वागत है भाई स्वागत है’ अशा घोषणा देत मोदींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सर्व खासदारांनी उभं राहून, टाळ्यांचा कडकडाट करुन मोदींचं स्वागत केलं.
संविधानाला वंदन
दरम्यान, मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी , सर्वात आधी संविधानाच्या प्रतीला वंदन केलं. संविधानाच्या प्रतीवर डोकं टेकवून मोदींनी वंदन केलं. यानंतर जे पी नड्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन, मोदींचं स्वागत करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर NDA ला 293 जागा मिळाल्या आहेत. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
बारामती(Baramati):लोकसभेला सुनेत्रा पवार, आता विधानसभेला जय पवार बारामतीतून रिंगणात उतरणार?