Panchayat Season3: 300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय ‘फुलेरा गाव’,जाणून घ्या ‘पंचायत 3’बद्दलचे पाच मजेदार किस्से,भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर;

Panchayat Season3: ‘पंचायत 3’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वच ही सीरिज चर्चेत आहे. जाणून घ्या या वेबसीरिजबद्दलचे पाच मजेशीर किस्से…

Panchayat Season3:’पंचायत 3′ (Panchayat 3) ही बहुप्रतीक्षित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. प्राईम व्हिडीओच्या (Prime Video) सर्वाधिक लोकप्रिय सीरिजमध्ये ‘पंचायत’चा समावेश आहे. आता 28 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर ‘पंचायत 3’ रिलीज झाली आहे. फुलेरा गाव आणि या गावातील गावकरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. 30 गावे फिरल्यानंतर निर्मात्यांनी ‘फुलेरा’ गावाची निवड केली आहे. याप्रमाणे आणखी काही किस्से जाणून घेतल्यानंतर प्रेक्षक हैराण होतील.

‘पंचायत 3’बद्दलचे पाच किस्से जाणून घ्या…

1.) ‘पंचायत’ वेबसीरिज पूर्णपणे फुलेरा गावावर आधारित आहे. या सीरिजमधील सर्वच कलाकार गावकऱ्यांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे सीरिजमधील कलाकारांनी परिधान केलेले कपडे लोकल मार्केटमधून खरेदी केलेले आहेत. पण स्वस्तात खरेदी केलेले हे कपडे नंतर सुकल्यावर खराब झाले. त्यामुळे कॉस्ट्यूम डिझायनरला पुन्हा एकदा मेहनत घ्यावी लागली.

2.) ‘पंचायत’मध्ये प्रह्लाज चाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता फेसल मलिक पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात काम करायला तयार नव्हता. पण लेखक आणि दिग्दर्शकांना ‘गँग्स ऑफ वासेपुर’मधील त्यांचं काम आवडलं. लेखक आणि दिग्दर्शकांच्या विनंतीला मान देत त्यांनी ही भूमिका करण्याचं ठरवलं.

3.) ‘पंचायत’ या वेबसीरिजचं शूटिंग भर उन्हात झालं आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. पण प्रजासत्ताक दिनाचं शूटिंग करण्यासाठी सर्व कलाकारांना स्वेटर परिधान करायला लागलं होतं. 26 जानेवारीला संपूर्ण भारतात थंडीचं वातावरण असतं. त्यामुळे कलाकारांना स्वेटर परिधान करणं गरजेचं आहे.

4.) ‘पंचायत’च्या एका एपिसोडमध्ये झपाटलेलं झाड दाखवण्यात आलं आहे. हे झपाटलेलं झाड शोधणं निर्मात्यांसाठी खूप कठीण होतं. अर्धी सीरिज संपल्यानंतरही मोठं झाड मिळत नव्हतं. त्यानंतर वेगवेगळ्या दिशेला संपूर्ण टीम झाड शोधण्यासाठी निघाली. अखेर ते झाड मिळालं. त्यानंतर दोन रात्रींमध्ये या सीक्वेंसचं शूटिंग पार पडलं.

5.) पंचायत या वेबसीरिजचं शूटिंग मध्यप्रदेशमधील एका गावात पार पडली आहे. पण सरपंच ऑफिसची जागा शोधणं कठीण होतं. दोन आठवडे वेगवेगळी ठिकाणं शोधण्यात आली. अखेर 300 गाव शोधल्यानंतर अपेक्षीत गाव मिळालं. पण या गावचा रस्ता खूप वाईट होता. त्यामुळे प्रोडक्शन हाऊसला त्यावर मेहनत घ्यावी लागली.

‘पंचायत 3’मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. द वायरल फीवरने या पंचायत सीरिजची निर्मिती केली आहे. ‘पंयायत 3’ची चाहत्यांना उत्सुकता आहे.

You may have missed