PM Narendra Modi: अयोध्येतील राममंदिर झाले, आता कैलासासाठी मोदींना मतदान करा, गुवाहाटीतील कामाख्या मंदिराच्या पुजाऱ्यांचं वक्तव्य

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा मतदान केल्यास कैलासाचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत गौरीश महाराज यांनी व्यक्त केले. सर्वधर्मीयांनी तिसऱ्यांदा कमळ बटन दाबून भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत बसवावे.

मुंबई: भारताचे हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी (PM Modi) हे महत्त्वाचे आहे. काही निर्णय घेण्यासाठी बहुमत नाही तर प्रचंड बहुमत लागते आणि ते महत्त्वाचे आहे. मी स्वत: दोनदा कमळाचे बटन दाबलं. मला प्रभू श्रीराम भेटले. मी तिसऱ्यांदा बटन दाबलं तर तर मला कैलाश भेटेल, असं म्हणत गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे(kamakhya temple) पुजारी असलेल्या गौरीश महाराज यांनी सर्वधर्मीयांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

कैलास पर्वत हे सर्वधर्मीयांचे महत्त्वाचे ठिकाण असून कैलासापर्यंत जाण्याचा मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. आता अवघा 20% मार्ग बाकी असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यामुळे आता सर्वधर्मीयांनी तिसऱ्यांदा कमळ बटन दाबून भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत बसवावे, असे आवाहन गौरीश महाराज यांनी केले आहे.

 

You may have missed