Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती.
कल्याण : तुमची स्वप्ने मोदींचा संकल्प, 4 जूननंतरही याच ताकदीने आणि मेहनतीने काम करणार, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला दिलं आहे. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला माझा नमस्कार, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी भाषणाची मराठीतून सुरुवात केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पित करतो. मी कल्याण भूमीवर आपला आशीर्वाद मागायला आलो आहे. पहिल्यांदा प्रत्येक घरात पाणी येताना बघत आहे. देश पहिल्यांदा 25 कोटी भाऊ-बहिणींना गरिबीतून बाहेर पडत असल्याचे बघत आहोत. पहिल्यांदा गरिबांजवळ आजारपणात मोफत उपचारासाठी गॅरेंटी कार्ड आहे. गरिबांना पाहिले प्राधान्य दिले आहे. गरिबांसाठी घरे बांधण्याचं काम सुरु आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.
काँग्रेसने हे पाप केलं
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हणाले, हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव केलं तर देशाला काही फायदा आहे का? हिंदूंसाठी इतकं आणि मुस्लिमांना इतकं हे पाप काँग्रेस करत होती. मी स्वतः याचा विरोध केला होता. ते सत्तेत आले तर हेच करणार. आपल्या देशाला एकत्र ठेवायचं आहे. अशा पद्धतीने वागणं चांगलं आहे का? महाराष्ट्रात यांचा एकही उमेदवार येता कामा नये. झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चारी मुंड्या चीत केलं आहे. सर्व मुसलमान ओबीसी आहेत, आरक्षणात पण गडबड केली. आता पुन्हा निवडून आले तर तेच करतील. हिंदुस्तानच्या विविधतेत एकता आहे. जोपर्यंत हे सत्तेमध्ये होते, तेव्हा कसा देश चालवला होता. कुठलीही गोष्ट आणि ठिकाण सुरक्षित नव्हतं. आतंकवादी सहज त्रास देत होते, पण काँग्रेस काय करत होती.
4 जूननंतर पण अशीच मेहनत करणार
भारतात आपण नवीन आत्मविश्वास बघत आहोत. सरकार बनल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय काम करणार यासाठी नियोजन केलं आहे, असं मोदींनी सांगितलं आहे. आज जेवढी मेहनत करतो तेवढीच मेहनत, 4 जूननंतर पण सुरू राहणार आहे. सरकारचं ब्ल्यू प्रिंट रेडी आहे. मी काशीमध्ये होतो. त्यावेळी मी पाहिलं देशातील तरुणाकडे नवीन कल्पना आहेत. प्रत्येक गोष्ट नावीन्य आहे. यामुळे मी प्रभावित झालो आहे. तुम्ही मला नवीन कल्पना लिहून पाठवा, त्यातील निवडक कल्पनांवर आम्ही काम करू आणि विकास करू, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं आहे.
तुमची स्वप्ने ही मोदींचा संकल्प
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, तुमची स्वप्ने ही मोदींचा संकल्प आहे. माझा प्रत्येक क्षण आणि तुमच्यासाठी आणि देशासाठी असेल. आज भारत ज्या उंचीवर पोहचला आहे, तिथून पुढे देशाला कोण घेऊन जाऊ शकतो. ज्यांनी गरिबी हटवण्याचा खोटा नारा दिला आणि गरिबीची माला जपली आहे. भ्रष्टाचार केले, असे लोक देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात का. मागच्या सरकारमध्ये ब्रेक लागला होता. मात्र ब्रेक हटवला आणि फास्ट गाडी घेऊन गेली. प्रत्येकाला विश्वास आहे, फिर एक बार मोदी सरकार काँग्रेस. कधीच विकासाचा विचार करू शकत नाही, असंही मोदींनी म्हटलं आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत