मोदी (PM Modi) स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. स्वतःच्या आई वडिलांना शिव्या देण्याची कला फक्त मोदींकडेच आहे. निवडणुकांच्या निकालावर सध्या कुणीही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मतदाराने काय केलं आहे, ते मतदार बोलायलाच तयार नाही. पण,यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
‘मोदी स्टंटबाज, यावेळी पंतप्रधान होणार नाहीत’
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी स्टंटबाज आहेत. हे आता पूर्णपणे लक्षात आल आहे. त्यांनी स्वतःला देव सुद्धा म्हटलं आहे आणि स्वत:च्या आई-वडिलांना शिव्या देण्याची कला ही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकडं घालावं हा स्टंट सुद्धा नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे लोकांनी एक करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहावं यापेक्षा काहीही नाही.
सामान्य माणसाला ग्लोबल वॉर्मिंगची चिंता नाही
जागतिक तापमान वाढलंय याकडे लोक प्रतिनिधींपेक्षा सामान्य माणूस कसं बघतो हे महत्वाचं आहे. सामान्य माणूस तापमानवाढीबाबत चिंतित नाही. तो चिंतित आहे, ते माझ्या समाजाचा माणूस निवडून येईल की नाही याबद्दल. सामान्य माणसाला ग्लोबल वॉर्मिंगची चिंता नसल्याने, जी चिंता सामान्य माणसाला त्याच प्रकारे राजकीय पक्ष किंवा नेते बोलत राहणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.
एकाही राजकीय पक्षाने दिल्लीतील हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं नाही
दिल्लीत वर्षभर हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन चाललं. एकाही राजकीय पक्षाने हमीभाव देऊ, असं आपल्या अजेंड्यात म्हटल नाही. मग शेतकऱ्यांनी त्यांना मतदान का केलं? सामान्य माणसाला रोजच्या प्रश्नांशी काही घेणं-देणं नाही त्याला चिंता आहे, ती सत्ता ही माझ्या समाजाच्या माणसाला मिळावी, हे त्याचं महत्त्व, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
बारामती(Baramati):लोकसभेला सुनेत्रा पवार, आता विधानसभेला जय पवार बारामतीतून रिंगणात उतरणार?