काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर येथे शनिवारी प्रियांका गांधी यांची सभा पार पडली…
काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी लातूर येथे शनिवारी झालेल्या जाहिर सभेत त्या बोलत होत्या कि गेल्या सत्तर वर्षात काय केले असे म्हणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षात काय केले हे सांगत नाहीत. दहा वर्षात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, महिलांच्या समस्या वाढल्या यावर ते बोलत नाहीत. लोकसभेची निवडणूक आली की त्यांची नौटंकी सुरु झाली आहे, अशा शब्दात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
देशात आज सत्तर कोटी बेरोजगार आहेत. केंद्रात तीस लाख पदे रिक्त असताना मोदी सरकार ते भरती करीत नाही. शिक्षित तरुणांना नोकरी नाही. महागाईने महिला त्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकडे पाहण्यास मोदींना वेळ नाही. पण अब्जाधिशांचे १६ लाख कोटी रुपये कर्ज त्यांनी माफ केले. गेल्या दहा वर्षात विकासाच्या ऐवजी लोकशाही दूर्बल केली. इलेक्टॉल बॉण्डच्या माध्यमातून देणगीच्या नावाने धंदा केला. कोविड व्हॅक्सीन तयार करणाऱ्यांना देखील त्यांनी सोडले नाही. पहिल्यांदा ईडीचा छापा टाकायचा आणि नंतर देणगी घेवून सोडून द्यायचे हा उद्योग केला गेला. सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सर्व काही समोर आले आहे. हे जनतेने ओळखले पाहिजे.
देशात अनेक पंतप्रधान झाले. माझ्या कुटुंबातून तीन पंतप्रधान झाले. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. या सर्वांनी पंतप्रधान पदाची उंची वाढवण्याचे काम केले. पण नरेंद्र मोदी यांनी मात्र ही उंची कमी केली. इतका अहंकारी नेता पाहिला नाही. त्यांना जनतेची काळजी राहिलेली नाही. सल्लागार देखील त्यांना बोलू शकत नाहीत, इतका अहंकार त्यांच्यात आला आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. विकासावर बोलण्याऐवजी धर्म, जातीवर बोलून त्यांनी नौटंकी सुरु केली आहे. निवडणूक आली की त्यांची नौटंकी सुरु होते हे आपण पाहिले आहे. ही नौटंकी आता चालणार नाही. त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे.
गेल्या दहा वर्षात लोकशाही धोक्यात आली आहे. हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पैशावर आमदार खरेदी केले गेले. तुम्ही निवडलेले सरकार पाडले गेले. पैशावर राजकीय पक्षात फूट पाडली. हे सगळे तुमच्या डोळ्यासमोर झाले आहे. आता ते संविधान बदलाची भाषा बोलू लागले आहेत. या निवडणुकीत ते विजयी झाले तर संविधान बदलले जाईल. त्यामुळे यांच्यापासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
जालना(Jalna):मनोज जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; उपोषणाचा पाचवा दिवस, अडचणी वाढल्या!
मराठा आरक्षण (Maratha Reservation):मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार, कारणही सांगितलं, म्हणाले….!