ससून ब्लड सॅम्पल फेराफेरी प्रकरणी पुणे पोलीस कसून चौकशी करत आहे. एक एक पत्ता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रकरणी आता ससून रुग्णालयाचील दोन-तीन नर्सची चौकशी करण्यात येत आहे.
पुणे(Pune) : पुणे(Pune) रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आला रोज नवे खुलासे होत आहे. यात ससून रुग्णालयाचादेखील कारभार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यावर रक्ताचे पुरावे बदलल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना निलंबित करण्यात आलं आहे शिवाय ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. याच प्रकरणात आता एकेकाची पुणे पोलीस कसून चौकशी करत आहे. एक एक पत्ता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रकरणी आता ससून रुग्णालयाचील दोन-तीन नर्सची चौकशी करण्यात येत आहे.
कल्याणी नगर अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल हेराफेरीत आता ससूनच्या काही नर्सला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बोलवलं. ज्या वेळी ब्लडमध्ये फेरफार करण्याचा प्रकार घडला. त्यावेळी तावरे आणि हळनोर यांच्यासोबत दोन तीन नर्सदेखील असल्याची माहिती आहे. ज्यावेळी सीटीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले त्यात नर्स असल्याचं दिसून आलं. त्यामुळे या नर्सचा या प्रकरणाशी काही संबंध आहे?, याचा तपास केला जात आहे. या दोघा डॉक्टरांच्या समवेत असणाऱ्या नर्सला पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवलेलं आहे.
ससूनच्या या प्रकरणावरुन आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात ससूनमधील नेमकं कोण कोण सहभागी आहे. कोणती साधारण असे प्रकार किती दिवसांपासून करत आहेत. यासाठी किती किंमत मोजली जात आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणाच्या सांगण्यावरुन ससूनमध्ये असे प्रकार घडत आहे, याची संपूर्ण चौकशी केली जात आहे. यात शिपायांपासून ते संबंधित सगळ्यांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे नर्सलादेखील बोलवण्यात आलं आहे.
ससूनमधून रक्ताचे नमुन्यात फेराफेरी केल्याने या संदर्भात ससूनचे डीन यांना प्रश्न विचारले जात होते. यात डॉ. अजय तावरेंनी हा प्रकार केल्याचं समोर आलं. त्यामुळे ससूनचे डीन असलेले डॉ. विनायक काळेंनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. हिच पत्रकार परिषद विनायक तावरेंना चांगलीच भोवल्याचं दिसत आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी हसन मुश्रीफांचं नाव घेतलं आणि त्यांच्यावर कारवाई करत संध्याकाळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):शहरातील सिडको परिसरात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर आज भीषण अपघात
लातूर(Latur): NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल; आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
वसई(Vasai): वसईत भर रस्त्यात तरूणीचा खून, हत्या केल्यानंतर त्याने…