पुणे: धनिकपुत्राचा दावा खरा की, खोटा? “मी नाही, ड्रायव्हर पोर्शे कारचा! पोलिसांकडून CCTV सह पोर्शेकार ची छाननी.

 पुणे पोर्शे दुर्घटनेनंतर पोलिसांकडून सातत्यानं तपास सुरू आहे. पोलिसांनी पोर्शे कारचा संपूर्ण तपशील आणि अपघात घडला त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे.

 पुणे : या प्रकरणात  (Pune Porsche Accident) अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांनी अपघातावेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचा दावा केला. त्यानंतर या प्रकरणात आरोपी आणि त्याच्या वडिलांकडून पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुख्य अल्पवयीन आरोपीसह त्याचे आजोबा, त्याचे मित्र, ड्रायव्हर, आरोपीच्या वडिलांची चौकशी केली आहे. यावेळी आरोपी आणि त्याच्या वडिलांनी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचा दावा केलाय. अशातच आरोपींच्या दाव्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र हलवली असून अपघाती गाडीचा संपूर्ण मार्ग तपासला आहे.

19 मे रोजी दोन निरपराध इंजिनिअर्सना चिरडणारी महागडी पोर्शे गाडी अग्रवाल यांच्या घरातून किती वाजता बाहेर पडली, याचा देखील तपास पोलिसांनी केला. पोलिसांनी अग्रवालांच्या घरापासून कोसी, तिथून ब्लॅक आणि तिथून अपघात स्थळापर्यंतच्या संपूर्ण मार्गाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी पूर्ण झाली आहे. महागडी गाडी अग्रवाल यांच्या कंपनीच्या नावावर आहे. गाडी सध्या येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे.

माझ्या मुलाला गाडी चालवू देत, मालकानंच सांगितल्यामुळे : ड्रायव्हर

अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा ताबा मागताना पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, अल्पवयीन आरोपीनं कार चालवायची मागणी केली. त्यानंतर ड्रायव्हरनं त्याच्या मालकाला (अल्पवयीन मुलाच्या वडिलांना) फोन केला. त्यावेळी धनिकपुत्राच्या बापानं माझ्या मुलाला गाडी चालवू देत, असं सांगितलं. मालकाच्या सांगण्यावरुनच मुलाला गाडी चालवू दिली, असं ड्रायव्हरनं सांगितलं. याप्रकरणी ड्रायव्हरला साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर करता येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आरोपी अल्पवयीन व्यक्तीने दावा केला आहे की, अपघाताच्या वेळी त्याच्या कुटुंबाचा ड्रायव्हर कार चालवत होता. अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांनीही या दाव्याचं समर्थन केलं आहे.

आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार 

पुणे(Pune) ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपींची आज पोलीस(Pune ) कोठडी संपणार आहे. आज पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील सहा आरोपींची पोलीस कोठडी पोलीस न्यायालयाकडे मागणार आहेत. विशाल अग्रवाल याचा संभाजीनग मधून जप्त केलेला मोबाईलही फॉरेन्सिक पथकाकडे सोपवण्यात आला आहे. गाडीत बसलेल्या 3 पैकी 2 मित्रांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मित्रांनी आणि आरोपीच्या कुटुंबीयांनी जबाब दिला आहे.