अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली नाही किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली. मात्री ही बाब अजित पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी थेट अधिका-याला बोलवत त्यांची कानउघडणी केली.
पुणे(Pune): राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार त्यांच्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या सडेतोड शब्दात ते उत्तरे देत असतात. कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात. त्यात कुचराई करणा-यांना ते नेहमी धारेवर धरत असतात. पुण्यात अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिका-यांना चांगलेच झापले आहे. असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन करायला आलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहे.
पुण्यातील (Pune) जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामां भूमिपूजन देखील अजित पवारांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्यांनी ते तेथील पाहणी करत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली नाही किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली. मात्री ही बाब अजित पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी थेट अधिका-याला बोलवत त्यांची कानउघडणी केली.
आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं जगदीश मुळीक यांनी बोलून दाखवलंय. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला कायम आदर आहे. महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीच संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुनील टिंगरे यांनी दिलीये. तसंच हे कार्यक्रम सरकारचे आहेत. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या स्तरावर ठरवण्यात आलं आहे .गैरसमज झाले असतील तर त्यांनी याची नोंद घ्यावी अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
नेमके काय घडले?पुण्यातील जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अजित पवार इमारतीच्या उद्घाटनासाठी(Pune) गाडीतून खाली उतरले. इमारतीकडे जाताना पहिल्याच पायरीला सिमेंट होते. ते सिमेंट व्यवस्थित साफ केलेले नव्हते. अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्याला विचारले हे असं का झालय? त्यावर अधिकाऱ्याने ते काढायचं राहिले असे उत्तर दिले. अधिकाऱ्याच्या या उत्तरानंतर अजित पवारांचा पारा चढला म्हणाले, हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहित आहे ना मी बारीक बघतो..मग हे कशाला झक मारायला ठेवलं का?पुढे गेल्यानंतर इमारतीच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मध्येच होते हे पाहून अजित पवार पुन्हा एकदा चिडले आणि अशी छा चू गिरी करू नका अशा शब्दात तिथल्या अधिकाऱ्यांना झापले.
एकदा नाही दोनदा झापले…
पुढे गेल्यानंतर (Pune) इमारतीच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मध्येच होते हे पाहून अजित पवार पुन्हा एकदा चिडले आणि अशी छा चू गिरी करू नका अशा शब्दात तिथल्या अधिकाऱ्यांना झापले.पुण्यातील जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामां भूमिपूजन देखील अजित पवारांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्यांनी ते तेथील पाहणी करत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली नाही किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली. मात्री ही बाब अजित पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी थेट अधिका-याला बोलवत त्यांची कानउघडणी केली.अजित पवार इमारतीच्या उद्घाटनासाठी गाडीतून खाली उतरले. इमारतीकडे जाताना पहिल्याच पायरीला सिमेंट होते. ते सिमेंट व्यवस्थित साफ केलेले नव्हते. अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्याला विचारले हे असं का झालय? त्यावर अधिकाऱ्याने ते काढायचं राहिले असे उत्तर दिले. अधिकाऱ्याच्या या उत्तरानंतर अजित पवारांचा पारा चढला म्हणाले, हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहित आहे ना मी बारीक बघतो..मग हे कशाला झक मारायला ठेवलं का?पुढे गेल्यानंतर इमारतीच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मध्येच होते हे पाहून अजित पवार पुन्हा एकदा चिडले आणि अशी छा चू गिरी करू नका अशा शब्दात तिथल्या अधिकाऱ्यांना झापले.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर
वडगावशेरी विधानसभा (Pune)मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं जगदीश मुळीक यांनी बोलून दाखवलंय. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला कायम आदर आहे. महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीच संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुनील टिंगरे यांनी दिलीये. तसंच हे कार्यक्रम सरकारचे आहेत. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या स्तरावर ठरवण्यात आलं आहे .गैरसमज झाले असतील तर त्यांनी याची नोंद घ्यावी अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत