पुणे(Pune):काल छगन भुजबळ अन् आज सुनेत्रा पवार, अजित पवार गटाचं नेमकं चाललंय काय?

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काल 15 जुलै रोजी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती.

पुणे(Pune):अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काल 15 जुलै रोजी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमागे तिसरी आघाडीचं प्रकरण असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनीच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करताना शरद पवारांनाच अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं.

काल छगन भुजबळांनंतर आज खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील(Pune)मोदी बाग येथे शरद पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. यावेळी निवासस्थानी सुप्रिया सुळेही असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काय बातचीत होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. मोदी बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार पोहोचल्या आहेत. ते बाहेर आल्यानंतर भेटीमागील नेमकं कारण कळू शकेल.

सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली?

सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. या भेटीत त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते.  शरद पवार, सुप्रिया सुळे मोदी बागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.⁠ सुनेत्रा पवार शरद पवार सुप्रिया सुळे यांना भेटल्या का⁠ याबात उत्सुकता देखील निर्माण झालेली आहे.

सुनेत्रा पवार साधारणपणे एक तास मोदीबागेत होत्या. एका तासानंतर सुनेत्रा पवार मोदी बागेमधून बाहेर पडल्या आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या, मात्र त्या शरद पवारांच्या भेटीला गेल्याची चर्चा होती. पण त्या अजित पवारांची बहीण नीता पाटील यांच्या भेटीला गेल्याचं स्पष्टीकरण अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी दिली.

 

You may have missed