‘महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. ‘
राज ठाकरे(Raj Thackeray):अवघ्या आठ महिन्यांपूर्वी 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मोठ्या उत्साहात भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. ही घटना पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी(Raj Thackeray) देखील या घटनेवरून सरकारची कानउघडणी केली आहे.
राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या अराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या 8 महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दाम देत आहे”.
कुसुमाग्रजांची कविता
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे की “पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांच्या निविदा काढायच्या, त्यातून काही मिळतंय का ते बघायचं इतकंच राहिलं आहे. या प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण(Raj Thackeray) छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो”.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 35 फुटी पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी लोकार्पण करण्यात आले. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता किरण माने याने प्रतापगडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतच किस्सा सांगत विद्यमान सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. १५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसंच शिवप्रेमीचं आकर्षण केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान या प्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमांचा यात समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले आढळले आहेत.पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर (Raj Thackeray)निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण येथील कार्यालयात जाऊन मोडतोड केली. परंतु, ‘या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आली होती’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहात होते. त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले असून नौदलाचे अधिकारी मंगळवारी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नौदलामार्फत काम या पुतळ्याची उभारणी कोणी केली, यावरून सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारल्याचा दावा करत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसह मालवण येथील या विभागाच्या कार्यालयात शिरून मोडतोड केली. मात्र, या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे होती, असा दावा राज्य सरकारने केला आहे. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची असल्याचा दावाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
पुणे(Pune):तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवलंय का? अजित पवारांनी सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं!