Site icon mcnnews.tv

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा टी-20 वर्ल्ड कप संघ जाहीर

T20 World Cup : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं टी -20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे.

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप साठी न्यूझीलंड, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा 15 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आलेला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा संघ देखील जाहीर करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियन टीम मिशेल मार्शच्या नेतृत्त्वात मैदानावर उतरणार आहे. मिशेल मार्श आस्ट्रेलियाचा टी-20 मॅचेससाठी पूर्ण वेळ कप्तान म्हणून नेतृत्त्व करत आहे. भारतात सध्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ट्रेविस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांना स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्सला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करत आहे कॅमेरुन ग्रीनला देखील संघात स्थान मिळालं आहे. ग्रीन सध्या आरसीबीकडून खेळत आहे. मात्र, तो चांगली कामगिरी करु शकलेला नाही.

2021 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं अनुभवी खेळाडूंवर विश्वास दर्शवला आहे. सध्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या जॅक फ्रेजर मॅक्गर्कला ऑस्ट्रेलियानं संधी दिलेली नाही. संघ निवडीपूर्वी मॅक्गर्कच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. ऑस्ट्रेलियानं मार्कस स्टॉयनिसला संधी दिलेली आहे. मार्कस स्टॉयनिस क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कराराच्या यादीत देखील नव्हता. ऑस्ट्रेलियनं क्रिकेट बोर्डानं टी-20 वर्ल्ड कपसाठी जर्सीचं अनावरण देखील केलं आहे.

 

ऑस्ट्रेलियाची टीम :

मिशेल मार्श (कप्तान), पॅट कमिन्स, एस्टन एगर, टिम डेविड, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर आणि अॅडम झम्पा.दरम्यान,  जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होत असून 30 जूनला संपणार आहे.

Exit mobile version