Travis Head : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेड यानं आयपीएल 2024 मध्ये धुमाकूळ घातला आहे.
Travis Head Water Boy In RCB : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेड यानं आयपीएल 2024 मध्ये धुमाकूळ घातला आहे. हैदराबादसाठी ट्रेविस हेड चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे. बुधवारी लखनौविरोधात हेडने कहरच केला. त्यानं अवघ्या 30 चेंडूमध्ये जवळपास 295 च्या स्ट्राईक रेटने 89 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने आठ चौकार आणि आठ षटकार ठोकले आहे. यंदाच्या हंगामातील ही त्याची पहिलीच विस्फोटक खेळी नाही. याआधीही त्याने प्रत्येक डावात पहिल्या चेंडूपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. पण तुम्हाला माहितेय का? ट्रेविस हेड याआधी आरसीबीमध्ये होता, त्यावेळी तो फक्त पाणी देण्याचं काम करत होतात. वॉटर बॉय ते विस्फोटक फलंदाज.. हा त्याचा आयपीएलमधील प्रवास सध्या चर्चेत आहे.
हैदराबादसाठी खेळण्याआधी ट्रेविस हेड आरसीबीच्या संघाचा सदस्य राहिलाय. रॉयल चॅलेंजर्स बगळुरुकडून हेड 2016 आणि 2017 आयपीएल हंगामात खेळलाय. पण त्याला जास्त सामने खेळता आले नाहीत. हेड याचा आरसीबीमधील जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हेड पाण्याची बॉटल घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल होतोय. एका युजर्सने हेड याचा फोटो पोस्ट करत म्हटलेय की, “विश्वास ठेवा ट्रेविस हेड आरसीबीमध्ये वॉटर बॉय होता… ” व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ट्रेविस हेड आरसीबीच्या जर्सीमध्ये दिसत आहे. तो एबी डिव्हिलियर्स याच्यासोबत सिमारेषाबाहेर उभा असल्याचं दिसत आहे.
More Stories
बर्मिंघम(Birmingham)शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा
vinesh phogat disqualified: विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?
आयपीएल(IPL 2025): T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच?