WI vs PNG : टी20 विश्वचषकाला धमाकेधार सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात अमेरिकेनं कॅनडाचा सात विकेटनं पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मोठा उलटफेर होता होता राहिलाय. दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा निसटता विजय मिळवता आला. वेस्ट इंडिजने पापुआ न्यू गिनी संघाचा पाच विकेटने पराभव केला. पापुआ न्यू गिनीने प्रथम फलंदाजी करताना 136 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान पार कऱण्यासाठी वेस्ट इंडिजला 5 विकेट अन् 19 षटकं लागली. रोस्टन चेजच्या वादळी खेळीच्या बळावर विडिंजला विजय मिळवता आला.
अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाच विकेट अन् सहा चेंडू राखून विजय मिळवला. आंद्रे रसेल आणि रोस्टन चेज यांच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अखेरच्या षटकात विजय मिळवला. पापुआ न्यू गिनीने प्रथम फलंदाजी करताना 136 धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये सेसे बाउ याने 43 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. किप्लिन डोरिगा याने अखेरच्या षटकात 18 चेंडूध्ये 27 धावांची शानदार खेळी केली. धावांचा पाठलाग करताा वेस्ट इंडिजला संघर्ष करावा लागला. 15 षटकांपर्यंत पापुआ न्यू गिनीनं भेदक गोलंदाजी केली. पण 18 व्या षटकात आंद्रे रसेल आणि रेस्टन चेज यानं वादळी फलंदाजी केली. त्यांनी 18 व्या षटकात 18 धावां लुटल्या अन् सामना फिरवला. पापुआ न्यू गिनीसाठी कर्णधार असद वालाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. रोस्टन चेज याने 27 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. त्यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेस होता. आंद्रे रसेल यानं 9 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिले.
पापुआ न्यू गिनीनं दिलेल्या 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अतिशय खराब झाली. दुसऱ्याच षटकात जॉनसन चार्ल्स स्वस्तात तंबूत परतला. टी20 विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या जॉनसन चार्ल्सला खातेही उघडता आले नाही. निकोलस पूरन याने पावरप्लेच्या अखेरच्या षटकात दोन षटकार ठोकत 18 धावा वसूल केल्या. पहिल्या सहा षटकात विडिंजने 52 केल्या. वेस्ट इंडिज आरामात जिंकणार असं वाटलं होतं, पण पापुआ न्यू गिनीच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक केले. निकोलस पूरन याला तंबूत पाठवले. पूरन याने 27 चेंडूत 27 धावांची खेली केली. त्यानंतर वेस्ट इंडिजने लागोपाठ विकेट गमावल्या. पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वाला याने ब्रँडम न किंग याला 34 धावांवर बाद केले. त्यानंततर रोवमन पॉवेल यानं डाव संभाळण्याचा प्रयत्न केला, पण मोठा फटका मारण्याच्या नादात तोही बाद झाला. पॉवेल याला फक्त 15 धावाच करता आल्या.
15 षटकात वेस्टइंडिजने 4 विकेटच्या मोबदल्यात 94 धावा केल्या होत्या. अखेरच्या पाच षटकात 43 धावांची गरज होती. त्यात भर म्हणून शेरफान रदरफोर्डही दोन धावांवर बाद झाला. रोस्टन चेज आणि आंद्रे रसेल यांनी विडिंजचा डाव सावरला. दोघांनी अखेरच्या तीन षटकात 31 धावा वसूल करत विजय मिळवला.वेस्ट इंडिजने पाच विकेटने विजय मिळवत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली.
More Stories
बर्मिंघम(Birmingham)शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा
vinesh phogat disqualified: विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?
आयपीएल(IPL 2025): T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच?