Will Jacks IPL Record GT vs RCB IPL 2024 : आरसीबीने गुजरात टायटन्सचा 9 विकेट्स आणि 24 चेंडू राखून मोठा पराभव केला. आरसीबीकडून विल जॅक्सने तुफान फटकेबाजी करत 41 चेंडूत शतकी खेळी केली. त्याला विराट कोहलीने 44 चेंडूत 70 धावा ठोकत चांगली साथ दिली.
सामना सुरू असताना सलामीला आलेला विराट कोहली आज शतक ठोकेल असं वाटत होतं. मात्र 31 चेंडूत 50 धावा करणाऱ्या विल जॅक्सने पुढच्या 10 चेंडूत शतकी मजल मारली. त्यानं आपली ही खेळी 10 षटकार आणि 5 चौकारांनी सजवली. आरसीबीने 201 धावांच टार्गेट 16 षटकातच पार केलं.विशेष म्हणजे विल जॅक जरी सर्वात वेगवान आयपीएल शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर असला तरी त्यानं 50 ते 100 चा प्रवास 10 चेंडूतच पार केला. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2013 मध्ये ख्रिस गेलने 50 ते 100 धावा 13 चेंडूत पूर्ण केल्या होत्या. आता हा विक्रम विल जक्सच्या नावार झाला आहे.Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी… विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर
सर्वात वेगवान आयपीएल शतक
- ख्रिस गेल – 30 चेंडूत शतक – 2013
- युसूफ पठाण – 37 चेंडूत शतक – 2010
- डेव्हिड मिलर – 38 चेंडूत शतक – 2013
- ट्र्रॅविस हेड – 39 चेंडूत शतक – 2024
- विल ज्रक्स – 41 चेंडूत शतक – 2024
आरसीबीने चेस केलेली सर्वात मोठी धावसंख्या
- 204 – पंजाब किंग्जविरूद्ध – 2010
- 201 – गुजरात टायटन्सनविरूद्ध – 2024
- 192 – रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरूद्ध – 2016
- 187 – सनराईजर्स हैदराबादविरूद्ध – 2023