Women’s T20 World Cup 2024 : महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

 

Women’s T20 World Cup 2024 : आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असुन. 3 ऑक्टोबरपासून आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदाची स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. या स्पर्धेत भारतीय महिलांचा संघ ग्रुप ए मध्ये असून पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा संघ देखील या ग्रुपमध्ये आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. 4 ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंडचा संघ एकमेकांसोबत येणार आहे.

जगभरातील अनेक चाहते भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची वाट पाहत असतात. महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर भारत आणि क्वालिफायर-1 यांच्यात सामना होईल. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना 13 ऑक्टोबरला रंगेल. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना 17 ऑक्टोबर आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना 18 ऑक्टोबरला होईल, तर अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने ढाका आणि सिलहटमध्ये 19 दिवसांत होतील. स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. अ गटात पाच संघ आहेत. ब गटातही पाच संघ आहेत. या गटात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि क्वालिफायर 1 चे संघ असतील. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2 संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे.

गटवारी :

Group A : ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर संघ-1

Group B: दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर संघ-2

ICC महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक :

October 3: Bangladesh v Qualifier 2, Dhaka

October 4: Australia v Qualifier 1, Sylhet

October 4: India v New Zealand, Sylhet

October 5: South Africa v West Indies, Dhaka

October 5: Bangladesh v England, Dhaka

October 6: New Zealand v Qualifier 1, Sylhet

October 6: India v Pakistan, Sylhet

October 7: West Indies v Qualifier 2, Dhaka

October 8: Australia v Pakistan, Sylhet

October 9: Bangladesh v West Indies, Dhaka

October 9: India v Qualifier 1, Sylhet

October 10: South Africa v Qualifier 2, Dhaka

October 11: Australia v New Zealand, Sylhet

October 11: Pakistan v Qualifier 1, Sylhet

October 12: England v West Indies, Dhaka

October 12: Bangladesh v South Africa, Dhaka

October 13: Pakistan v New Zealand, Sylhet

October 13: India v Australia, Sylhet

October 14: England v Qualifier 2, Dhaka

October 17: First semi-final, Sylhet

October 18: Second semi-final, Dhaka

October 20: Final, Dhaka

 

You may have missed