औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा 2024 साठी,निवडणूक विभाग सज्ज, 13 मे 2024 सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ.

औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा 2024 साठी,निवडणूक विभाग सज्ज, 13 मे 2024 सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ.

प्रतिनिधी अन्वरअलमनूरजाफर /mcnnews

352 एसटी महामंडळाच्या बसेस आणि लहानमोठी 1250 वाहने निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी सज्ज.औरंगाबाद लोकसभा 2024 साठी,जिल्हा निवडणूक विभाग सज्ज, 352 एसटी महामंडळाच्या बसेस, एकूण 1250 लहान मोठी वाहने, मतदान यंत्र आणि मतदान केंद्र यंत्रणा उभारण्यासाठी सज्ज. पोलिसांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे थ्री टीयर मध्ये बंदोबस्त तैनात,तर जिल्हात अनेक ठिकाणी पोलीसांचे पथ संचालन, संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभाग तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांसह सज्ज करण्यात आले आहे. तर मतदान केंद्रावर स्तनदा मातां आणि लहान बाळासाठी पाळणाघराचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हातील सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील मतदार संख्या २० लाखापेक्षा जास्त आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ६३% मतदान झाले होते ह्यावेळेस ७५% मतदान अपेक्षित आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज केली असून जिल्ह्यातील वीस हजार कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आहेत २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ६३% मतदान झाले होते ह्यावेळेस ७५% मतदान अपेक्षित आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज केली असून जिल्ह्यातील वीस हजार कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आहेत.

You may have missed