Chhatrapati Sambhajinagar :छत्रपती संभाजीनगर: लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची पत्रकार परिषद, 4 अपक्ष उमेदवारांनी दिला पाठिंबा

Chhatrapati Sambhajinagar :छत्रपती संभाजीनगर: लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची पत्रकार परिषद, 4 अपक्ष उमेदवारांनी दिला पाठिंबा

प्रतिनिधि सुमित दंडुके/mcnnews

भुमरे लाखोंच्या मतांनी निवडून येणार

पुढे बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लढतीवरही प्रतिक्रिया दिली. येथून संदिपान भुमरे यांचाच विजय होणार, असं सत्तार म्हणाले. संदिपान भुमरे हे संभाजीनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. ते संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. भुमरे संभाजीनगरमधून लाखोंच्या मतांनी निवडून येतील, यात कुठलीही शंका नाही. कारण संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणूनच भुमरे येथून जिंकतील, असा विश्वास पाठिंबा दिलेल्या प्रतिनिधिंनी  व्यक्त केला.

संभाजीनगर शहरातून तिहेरी लढत होणार आहे.

कारण चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे यांच्यासह येथून एमआयएमचे नेते तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेदेखील तेथून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील हेदेखील येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भुमरे, खैरे यांना मतफुटीचा धोका निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची पत्रकार परिषद, 4 अपक्ष उमेदवारांनी दिला आहे पाठिंबा

श्री.संदीप दादाराव मानकर (अपक्ष उमेदवार)

सौ पंचशीला जाधव (अपक्ष उमेदवार)

श्री.घुगे नितीन (अपक्ष उमेदवार)

या तिन्ही उमेदवारांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार श्री.संदीपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर केला

पहा विडिओ

 

You may have missed