Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मधील बीड बायपासवर दोन गटात राडा

वाद सुरु असताना पोलीस हद्द ठरवत असल्याने प्रकरण वाढले

Chhatrapati Sambhajinagar:छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगर शहरातील बीडबायपास परिसरातील सहारा सिटीजवळ शिवशाही कॉलनीत 29 एप्रिलच्या रात्री प्लॉटिंगच्या वादातून दोन गट आपसात भिडले, यात दोन्ही गटातील महिला गंभीर जखमी झाल्या. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही आमची हद्द नाही असे सांगून टाळण्यात आले. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला.

 

शिवशाही कोलनीत रात्री प्लॉटिंगच्या कारणावरुन दोन गटात वाद सुरु झाले. वादाचे रूपांतर हानामारीत सुरु झाले. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस मात्र ठिकाण ऐकून ही हद्द आमची नाही असे सांगून टाळत होते. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे फोन जाताच त्यांनी एक पथक घटनास्थळी रवाना केले. तसेच सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यातुन देखील एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. मात्र पोलीस पोहोचेपर्यन्त दोन तासात अनेक महिला आणि मुले जखमी झाले होते. पोलिसांनी तात्काळ जखमी महिलाना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत अपर्णा विलास चव्हाण, सारिका मुरली चव्हाण, सीमा श्रावणे-भोसले, एक 14 वर्षीय मुलगा आणि इतर 4 ते 5 महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान आज दुपारी घाटीतुन रिपोर्ट आल्यानंतर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may have missed