हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra weather: राज्याच्या विविध भागातपावसाचा जोर अससल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात मुसळधार पावसाच इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु
पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा(Maharashtra weather)जोर पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळं उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. यामुळं पंढरपुरात पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. यापूर्वी 2006 साली उजनी धरणातून तब्बल सव्वा तीन लाख तर वीर धरणातून 1 लाख क्युसेक निसर्गाने पाणी सोडल्यानंतर पंढरपुरात सर्वात मोठा महापूर आला होता. त्यावेळी विठ्ठल मंदिराजवळ असणाऱ्या चौफाळा येथेही पाणी आले होते. यंदाही परिस्थिती तशीच असून ऑगस्टच्या सुरुवातीलाच सर्व धरणे भरली असून अद्यापही पावसाचे दोन महिने जायचे असल्याने पंढरपूरसह परिसरावर महापुराची टांगती तलवार कायम आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं. तसेच अनेक ठिकाणी शेती पिकांचं देखील नुकसान झालं होते. दरम्यान, नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर दुसरीकडे धरणांच्या (Maharashtra weather)पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिखामची धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळं राज्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत