Nashik : नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजप नाराज

Nashik : नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा केली.

 

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा केली.

 

काल दक्षिण मुंबईत शिवसेना शिंदे गटाने अरविंद सावंत यांच्या विरोधात आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. तर आता ठाण्यातून राजन विचारे यांच्याविरोधात नरेश म्हस्के यांना मैदानात उतरविले आहे. तसेच कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांचे नाव अखेरच्या टप्प्यात जाहीर केले आहे. महायुतीमध्ये काही जागावरून गेल्या काही दिवसांत तिढा निर्माण झाला होता. यापैकी आता पालघर लोकसभा मतदारसंघ उरला आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा केली.

 

तसेच लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून महाराष्ट्रात तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. राज ठाकरे यांचा मनसे पक्षही आता प्रचारात उतरणार असून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसेकडून सभा घेतली जाणार आहे. कोण कोणत्या जागेवरुन बाजी मारलं हे चित्र पाहण्यासारखे असेल.