मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय? गाड्या फोडायच्या आहेत तर मी तुम्हाला नावे देतो, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
परभणी(Parbhani):राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आले. गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना वंचित बहुनज विकास आघाडीचे अध्यक्षप्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? शरद पवार ,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.
प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत आहेत. परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले आहे. तसेच जिंतेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांना चिल्लर म्हणून देखील संबोधले आहे. प्रकश आंबेडकर म्हणाले, मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय? गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्ही तर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे आणि अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे, अशा चिल्लर लोकांच्या काय फोडताय? यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावे मी तुम्हाला देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. अजित पवार यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर झाला होता हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. याप्रकरणी आता अंकुश कदम आणि धनंजय जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंवर तिखट शब्दांत टीका केली होती. विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराला संभाजीराजे जबाबदार आहेत, ते छत्रपतींसारखे वागले नाहीत, ते शाहू महाराजांचे पुत्र आहेत का याबाबतच मला शंका आहे असं आव्हाड म्हणाले होते. यानं संभाजीराजेंचे समर्थक संतापले. आम्ही आव्हाडांना धडा शिकवू असं या कार्यकर्त्यांनी आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आव्हाडांच्या घरी सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. दरम्यान, आव्हाडांवरील या हल्ल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत