KKR : केकेआर संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत
अहमदाबाद: कर्णधार श्रेयस अय्यर ( ५८) आणि व्यंकटेश अय्यर (नाबाद ५१) यांच्या नाबाद ९७ धावांच्या भागीदारीच्या बळावर केकेआर(KKR) संधाने सनरायझर्स हैदराबाद संघावर आठ विकेटने विजय नोंदवत आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरी नंतर फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी करत केकेआर संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन्ही प्रकारात हैदराबाद संघाची कामगिरी सुमार ठरली, नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबाद संघाच्या बाजूने एकही अनुकूल गोष्ट घडली नाही.
केकेआर संघाने यापूर्वी २०१२, २०१४, २०२१
या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. आता चौथ्यांदा केकेआर(KKR) संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. फायनल सामना २६ मे रोजी चेन्नईत होणार आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यात धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराचाद संघाला केकेआर संघाने १५९ धावांवर रोखून अर्धी लढाई जिंकली. त्यानंतर १६० धावसंख्येचा पाठलाग करताना गुरबाज व सुनील
नरेन या सलामी जोडीने संघाला आक्रमक सुरुवात
करुन दिला. गुरबाजने फिल सॉल्टची उणीव भासू दिली नाही, गुरवाजने १४ चेंडूत २३ धावांची वेगवान खेळी साकारली, त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले, नटराजनने गुरबाजला तंबूत पाठवून ही जोडी फोडली. ४४ धावसंख्येवर गुरचाज तंबूत परतला. त्यानंतर सुनील नरेन १६ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला. नरेनने चार चौकार मारले, कमिन्सने नरेनचा बळी घेत संघाला दुसरे यश मिळवून दिले. केकेआर संघाने सलामी जोडी गमावली तेव्हा त्यांची धावसंख्या ६७ होती. कर्णधार श्रेयश अम्पर व व्यंकटेश अय्यर या जोडीने चौफेर फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला. साहजिकच हैदराबादच्या गोलंदाजांवर दबाव वाढला. त्यात क्लासेन याने श्रेयसचा झेल सोडला. हेडनेही श्रेयसचा एक सोपा झेल सोडला. श्रेयसला लागोपाठ दोन जीवदाने लाभली. श्रेयस अय्यर व व्यंकटेश अय्यर या जोडीने तिसरया विकेटसाठी आक्रमक अर्धशतकी भागीदारी करून संधाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त बनवल
व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत स्फोटक अर्धशतक ठोकले. व्यंकटेशची धमाकेदार फटकेबाजी पाहून श्रेयस अय्यरने
देखील आपल्या फलंदाजीचा गेअर बदलला आणि तुफानी फलंदाजी करत २३ चेंडूत अर्धशतक साजरे केले. श्रेयस अय्यरने षटकाराने केकेआर संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. श्रेयसने हेडला दोन लागोपाठ षटकार मारुन केकेआर संघाला आठ विकेटने दणदणीत विजय मिळवून दिला. श्रेयसने अवध्या २४ चेंडूत नाबाद ५८ धावा फटकावल्या. त्याने चार टोलेजंग षटकार व पाच चौकार मारले, व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा काढल्या, त्याने चार उत्तुंग षटकार व पाच चौकार लगावले. केकेआरने १३.४ षटकात दोन बाद १६४ धावा काढून आठ विकेटने सामना जिंकला, नटराजन व कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला
हैदराबाद सर्वबाद १५९
तत्पूर्वी, मिचेल स्टार्कच्या भेदक आणि भन्नाट वेगवान स्पेलने क्वालिफायर १ लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघाची दाणादाण उडवून दिली. स्टार्कसह केकेआर संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी नोंदवत हैदराचाद संचाला १५९ धावसंख्येवर रोखले. राहुल त्रिपाठी याने ५५ धावांची आक्रमक खेळी करत एकाकी झुंज देत दिली. आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात हैदराबादच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. पॅट कमिन्सचा प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय हैदराबादला प्रचंड महागात पडला.
सनरायझर्स हैदराबाद संधाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु, हैदरावाद संघाची सुरुवात खराब झाली. आक्रमक सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (०) दुसरयाच चेंडूवर क्लीन बोल्ड झाल्याने हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला. मिचेल स्टार्कच्या उत्कृष्ट चेंडूवर हेड बाद झाला, पाठोपाठ अभिषेक शर्माला (३) वैभव अरोराने बाद करून संघाला दुसरे मोठे यश मिळवून दिले. आंद्रे रसेलने कव्हरमध्ये अभिषेकचा शानदार झेल
घेतला, हैदराबाद संघाने २ षटकातच १३ धावांवर सलामी जोडी गमावली. हेड सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला.
यंदाच्या आयपीएल हंगामात हैदराबाद संघाच्या धमाकेदार कामगिरी हेड व अभिषेक या सलामी जोडीचा मोठा वाटा राहिला आहे. परंतु, क्वालिफायर १ सारख्या महत्त्वाच्या लढतीत ही सलामी जोडी सपशेल अपयशी
पाचवा धक्का दिला. हेन्रत्रीक क्लासेनची आक्रमक ३२ धावांची खेळी संपुष्टात आली. क्लासेनने २१ चेंडूत एक षटकार व तीन चौकार मारले. क्लासेन व राहुल त्रिपाठी या जोडीने ६२ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. मात्र, क्लासेन अशा वेळी बाद झाला जेव्हा हैदराबाद संघ सावरत होता. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना
राहुल त्रिपाठी याने आक्रमक अर्धशतक झळकावले. राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकी खेळीने हैदराबाद संघ थोडासा सावरला. मात्र, अब्दुल समदच्या एकेरी धावेसाठी घेताना राहुल त्रिपाठी दुर्देवीरित्या धावबाद झाला. राहुलने ३५ चेंडूत ५५ धावांची शानदार खेळी केली. त्याने सात खणखणीत चौकार व एक षटकार मारला. समदच्या चुकीमुळे राहुलची महत्वाची विकेट हैदराबादने गमावली, पाठोपाठ सुनील नरेन याने सनवीर सिंगला (०) पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड करून सातवा धक्का दिला. त्यावेळी
हैदराबादची स्थिती सात बाद १२१ अशी बिकट होती. अब्दुल समदने (१६) दोन उत्तुंग षटकार मारुन अपेक्षा वाढवल्या होत्या. परंतु, हर्षित राणाला जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. श्रेयस अय्यरने सीमारेषेवर अचूक झेल घेतला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार धावांचे खाते न उघडत्ताच बाद झाला.
कर्णधार पैट कमिन्स याने २४ चेंडूत ३० धावांची महत्त्वाची खेळी केली. कमिन्सने दोन चौकार व दोन पटकार ठोकत सामन्यात थोडी रंगत आणली, कमिन्सने विजयकांत व्यासकांत (नावाद ७) समवेत अखेरच्या विकेटसाठी नाबाद ३८ धावांची भागीदारी करत संघाला १५९ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. हैदराबादने १९.३ षटकात सर्वबाद १५९ धावा काढल्या.
ठरली. त्यानंतर पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने दोन धक्के देत हैदराबाद संघाची स्थिती चार बाद ३९ अशी दयनीय करून टाकली. नीतिश रेड्डीला ९ धावांवर स्टार्कने वाद केले आणि पाठोपाठ शाहवाज अहमदला (०) अप्रतिम चेंडूवर क्लीन बोल्ड केले, पॉवर प्लेमध्ये हैदरावादने चार बाद ४५ धावा काढल्या. ११व्या षटकात वरुण चक्रवर्ती याने हैदराबादला
मिचेल स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी करत ३४ धावांत तीन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती याने अचूक गोलंदाजी करत २६ धावांत दोन गडी बाद केले. वैभव अरोरा (१-१७), हर्षित राणा (१-२७), सुनील नरेन (१-४०) व अआंद्रे रसेल (१-१५) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
More Stories
बर्मिंघम(Birmingham)शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा
vinesh phogat disqualified: विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?
आयपीएल(IPL 2025): T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच?